देशाच्या उत्तरेत पावसाचा थैमान हा सुरुच आहे. उत्तर भारतामध्ये पावसाचा कहर सुरु आहे. आतापर्यंत उत्तर भारतातील पर्जन्य परिस्थितीमुळे तब्ब्ल ५५० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आलेल्या पूरामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
उत्तर भारतात सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये एकूण ५५० जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू हिमाचल प्रदेशमध्ये झाले आहेत. ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह अन्य राज्यांमध्ये ५६ जण मृत्युमुखी पडले आहेत. हिमाचलमध्ये ३ दिवसांत १२ इंच पाऊस पडला, जो सरासरीपेक्षा १० पटीनं अधिक आहे. इथे डोंगर कोसळत आहेत. भूस्खलनामुळे घरे आणि पूल कोसळत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशसह २४ राज्यांमध्ये येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय. त्याचवेळी, १२ जुलैपर्यंत हिमाचलमधील १२ पैकी १० जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.