मुंबई, ६ जून २०२३, प्रतिनिधी : भारतीय कामगार सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठया दिमाखात साजरा करण्यात आला.
सोहळ्यानिमित्ताने वेदमंत्रांच्या जयघोषात शिवप्रतिमेवर अभिषेक करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले.
या दिमाखदार अश्या सोहळ्यास मुंबई विमानतळावरील कामगार आणि शिवप्रेमीदेखील मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तेसच नियोजन भारतीय कामगार सेना विमानतळ विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.