नागपुरातील मजुराला 314 कोटींची नोटीस

नागपूर जिल्ह्यातील एका मजुराला तब्बल 314 कोटींची नोटीस बजावण्यात आली आहे. आयकर विभागाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. बिकट परिस्थिती असणाऱ्या मजुराला नोटीस आल्याने त्याला धक्का बसला आहे.
नागपुरातील मजुराला 314 कोटींची नोटीस

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका मजुराला तब्बल 314 कोटींची नोटीस बजावण्यात आली आहे. आयकर विभागाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. बिकट परिस्थिती असणाऱ्या मजुराला नोटीस आल्याने त्याला धक्का बसला आहे. 
हातावर पोट भरणारे, मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे चंद्रशेखर कोहाड यांना आयकर विभागाकडून तब्बल 314 कोटी रुपयांची नोटीस मिळाल्याने खळबळ उडाली आहे.  बिकट परिस्थितीत नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच कोहाड यांच्या नावावर मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

हेही वाचा : उदयनराजेंच्या वक्तव्यानं नव्या वाद?

चंद्रशेखर कोहाड कोण? 
चंद्रशेखर कोहाड नागपुरात मजूराचे काम करत आहेत. कोहाड मूळचे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आहेत. कोहाड हे काही दिवसांपासून नागपूरमध्ये मजुरीचे काम करत आहेत. अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत असताना इतक्या मोठ्या रकमेची आयकर नोटीस मिळाल्यामुळे कोहाड यांची प्रकृती खालावली असून सध्या त्यांच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रशेखर कोवाड यांनी एका पतसंस्थेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचा आयकर विभागाला संशय होता. चंद्रशेखर कोवाड यांचेच पॅन नंबर आणि आधार कार्ड नंबर या सर्व ट्रांजेक्शनसाठी वापरण्यात आले आहेत. चंद्रशेखर कोवाड यांच्या नावानेच हजारो कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याने त्यांना 314 कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली.

कोहाड यांना 314 कोटींचे व्यवहार केल्याप्रकरणी नोटीस आली आहे. आयकर विभागाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. आता एका गरीब मजूराच्या नावावरू आर्थिक व्यवहार कोणी केले असतील? कोहाड यांना अडकवण्याचा प्रयत्न कोणी केला असेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version