तीन अज्ञातांकडून तरुणावर हल्ला

तीन अज्ञातांकडून तरुणावर हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

नागपूरच्या रायपूरमध्ये चाकूने हल्ला केल्यानं तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. तीन अज्ञात इसमांनी तरुणावर हल्ला केला. सोमवारी सायंकाळच्या सुमारस ही घटना घडली. हल्लेखोर मोटारसायकलवरुन आले असता तरुणावर वार करत त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढलाय. समीर रफिक शेख असं या मृत तरुणाचं नाव आहे.

 

समीरवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याला तात्कळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान समीरचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी आरोपींच्या मोटरसायकलचा नंबर पोलिसांना दिला. त्यानुसार पोलीस त्या गाडीचा शोध घेत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version