‘एसटी कामगारांच्या २८ युनियन आहेत. त्या सर्वांच्या प्रतिनिधींसोबत बसून सरकारने कामगारांच्या अनेक मागण्या मार्गी लावल्या आहेत. विलिनीकरणाच्या व्यतिरिक्त आणखी कुठलेही मुद्दे असतील तर त्यावरही चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण प्रत्येकाशी चर्चा करणे शक्य नाही. त्यामुळे चर्चा नेमकी कुणाशी करायची हे कामगारांनीच सांगावे,’ असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.
एसटी कामगारांच्या २८ युनियन आहेत. त्यामुळे प्रत्येकाशी चर्चा करणे शक्य नसल्यामुळे नेमकी चर्चा कोणाशी करायची? असा सवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केला आहे. विलिनीकरणाचा मुद्दा वगळता इतर कुठल्याही प्रश्नावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे. तसेच एसटीचे रोजंदारी कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवणार असल्याचा इशारा अनिल परबांनी दिला आहे.
विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात संप करण्याचा सातवा दिवास आहे. तसेच मागण्या पूर्ण करण्यासाठी आझाद मैदानातला संप सुरूच ठेवण्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मंत्रालयात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक घेण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.