पश्चिम बंगालमध्ये निवडणूक हिंसाचार

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक हिंसाचार

पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरु असून यामध्ये हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम बंगाल राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. मतदानादरम्यान काही ठिकाणी गोळीबार, तर काही ठिकाणी स्फोट करण्यात आला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये शनिवारी (दि ०८) पार पडत असलेल्या मतदानात हिंसाचाराच्या घटना घडल्या. मृतांमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजप आणि माकप-डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. राज्यात झालेल्या हिंसाचारासाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप डाव्यांनी आणि भाजपने केला आहे. काही ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्यात, काही ठिकाणी बॅलेट बॉक्स पळवण्यात आले. काही ठिकाणी मतदारांना पळवले जात आहे. पंचायत निवडणुकांसाठी मतदान सुरू होण्याआधीच सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मतदानाच्या वेळी हिंसाचार वाढला. दुपारपर्यंत एकूण २६ जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

या सगळ्या प्रकरणावर तृणमूल यांनी उलट सवाल उपस्थित केला. पश्चिम बंगाल काँग्रेस केंद्रीय सैन्य तैनात करण्याची मागणी करत आहेत. मग, केंद्रीय दलांची सर्वाधिक गरज असताना ते कुठे आहेत? असा प्रश्न तृणमूलने केला. तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार होत असल्याचं पक्ष नेते कुणाल घोष हे म्हणाले
‘बंगालमधील राजकीय आणि निवडणुकीचे वातावरण हिंसाचाराने भरलेले आहे.’ ‘ही लोकशाही आणि पंचायत निवडणुकांची फसवणूक आहे.’ हे निवडणूक गैरप्रकारांचे ज्वलंत उदाहरण असल्याची टीका त्यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version