खासदार संभाजीराजेंची ‘ती’ मागणी पूर्ण होणार कधी?

खासदार संभाजीराजेंची ‘ती’ मागणी पूर्ण होणार कधी?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एकीकडे जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने गडकोट स्वच्छता राबवायची. मात्र, दुसऱ्या बाजूला गडकोट संवर्धनासाठी नेमलेल्या ब्रँड अँबेसिडरचे मात्र म्हणणे ऐकूण घ्यायचे नाही असा राज्य सरकारचा प्रकार सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गडकोट संवर्धनासाठी आणि छत्रपतींचा खरा इतिहास समजण्यासाठी रायगड किल्ल्यावर मंत्रिमंडळ बैठक घेण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांच्याकडून सातत्याने होत आहे.

मात्र, याला आद्यपही सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल खासदार संभाजीराजेंनी खंत व्यक्त केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version