मुंबई, २९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दहावी व बारावीची परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले आहेत. निकाल वेळेत लावण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे. त्यानुसार २५ मेपर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल ६ जूनपूर्वी जाहीर होईल, तसेच परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.