बारामती कोणाचं ऐकणार ?

बारामती कोणाचं ऐकणार ?

मुंबई, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : राशपकडून बारामतीसाठी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली. ही उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी जाहीर झाली. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची पत्नी आहेत तर सुप्रिया सुळे या अजित पवार यांची चुलत बहीण आहेत. समाजकार्य आणि महिलांचे प्रश्न हाताळणे या निमित्ताने सुनेत्रा पवार अनेक वर्षांपासून बारामतीमध्ये काम करत आहेत. पहिल्यांदाच त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. या निमित्ताने बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा संघर्ष दिसणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात अशी होणार लढत

सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सुप्रिया सुळे, राशप विरुद्ध महेश भागवत, ओबीसी बहुजन

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version