रविवारच्या सभेमुळे मविआत अस्वस्थता

रविवारच्या सभेमुळे मविआत अस्वस्थता

मुंबई, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : राहुल गांधी यांच्या यात्रेचा समारोप रविवारी मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. ज्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज ऐकण्यासाठी जनसमुदाय लोटत होता तिथे राहुल गांधी सभा घेणार आहेत. या सभेत मविआच्या इतिर नेत्यांसह उद्धव यांचेही भाषण होईल. सभेचा शेवट राहुल यांच्या भाषणाने होईल. पण ही सभा होण्याआधीच मविआमध्ये अस्वस्थता पसरण्यास सुरुवात झाली आहे.

सभेचा खर्च कोणत्या राजकीय पक्षाने करावा यावरून मविआत मतभेद सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत. यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यास शिउबाठा इच्छुक आहे. पण राहुलच्या सभेचा कोणत्या पक्षाला फायदा होणार यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. यामुळे सभा होण्याआधीच मविआत अस्वस्थता वाढल्याचे वृत्त आहे.

मुंबईत लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा
राहुलच्या सभेचा खर्च कुणाच्या खात्यात?
आचारसंहितेत होणाऱ्या सभेचा खर्च आयोगाच्या निशाण्यावर

राहुल पत्रकार परिषदेत गैरहजर, ठाण्यातले पत्रकार राहुलवर संतापले

राहुल गांधी यांची यात्रा शनिवारी ठाणे जिल्ह्यात असताना पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला राहुल गांधी अनुपस्थित होते. त्यांनी ठाण्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देणे टाळले. यामुळे ठाण्यातले पत्रकार राहुलवर संतापल्याचे वृत्त आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version