छत्रपती संभाजीनगरमध्ये मनाई आदेश जारी

छत्रपती संभाजीनगरमध्ये मनाई आदेश जारी

छत्रपती संभाजीनगर, दि. १६ मार्च, २०२४, प्रतिनिधी : जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अप्पर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी कलम ३७(१) व ३७(२) अन्वये दि.३१ मार्चपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, दाहक स्फोटक पदार्थ बाळगणे, पाच किंवा अधिक व्यक्तिंना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणे तसेच निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात पूर्वपरवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक ग्रामिण यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना राहतील,असेही विनोद खिरोळकर यांनी स्पष्ट केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version