निरुपम काँग्रेस सोडणार ?

निरुपम काँग्रेस सोडणार ?

मुंबई, २० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खासदार मिलिंद देवरा आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या पाठोपाठ संजय निरुपम काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. निरुपम काँग्रेस सोडून भाजपा किंवा शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. निरुपम यांनी काँग्रेसकडून २०१९ मध्ये उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता याच मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवण्यास निरुपम इच्छुक आहेत. ज्या पक्षाकडून संधी मिळेल त्याच पक्षात प्रवेश करायचा अशी त्यांची भूमिका असल्याचे समजते. निरुपम यांनी काँग्रेस सोडल्यास हा महाराष्ट्र काँग्रेससाठी चौथा मोठा धक्का असेल.

याआधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. माजी खासदार मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांना भाजपाकडून तर मिलिंद देवरांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. यानंतर निरुपम काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version