आमदार राजन साळवींना एसीबीचे समन्स

आमदार राजन साळवींना एसीबीचे समन्स

रत्नागिरी, १९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे उद्धव समर्थक आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) सोमवार २२ जानेवारी रोजी चौकशीला हजर होण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. याआधी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) त्यांच्या मालमत्तांवर धाड टाकली तसेच त्यांची काही तास कसून चौकशी केली. राजन साळवी यांच्या विरोधात तसेच त्यांच्या पत्नी आणि मोठ्या मुलाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. अटकेची कारवाई झाली तर त्याला सामोरा जाईन पण परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला. दबाव टाकण्यासाठी एसीबीमार्फत कारवाई सुरू असल्याचेही आमदार राजन साळवी म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version