उद्धव महागद्दार, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

उद्धव महागद्दार, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, १० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : उद्धव महागद्दार आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर ‘जय महाराष्ट्र’ला प्रतिक्रिया देत होते. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय विधानसभाध्यक्षांनी कायम ठेवला आहे. पक्षातील लोकशाहीला विधानसभाध्यक्षांनी महत्त्व दिले आहे. उद्धव यांनी स्वार्थासाठी लोकशाहीची हत्या केली. या उलट आम्ही शिवसेना राखली. बाळासाहेबांच्या विचारांनुसार काम करत आहोत आणि करत राहू असे मुख्यमंत्री म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version