अजित पवारांचा संभाजीनगर दौरा रद्द

अजित पवारांचा संभाजीनगर दौरा रद्द

छत्रपती संभाजीनगर, २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा रद्द झाला. गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन अजित पवार करणार होते. तसेच आमदार सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करण्यात आलेल्या निवडक विकास कामांचे उद्घाटन अजित पवार करणार होते. मात्र हा दौरा रद्द झाला आहे. हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे अजित पवार यांनी छत्रपती संभाजी नगरचा दौरा रद्द केला असल्याची माहिती समोर येत आहे. तर राजकीय वर्तुलात मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे अजित पवारांचा दौरा रद्द झाल्याची चर्चा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version