मुंबई, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ या घोषणा देत गिरगाव ते वर्षा बंगला असा मोर्चा निघाला. मुंबईत काढण्यात आलेला हा मराठा समाजाचा मोर्चा गिरगाव चौपाटीजवळच्या शहीद स्मारकापासून दीडशे मीटर अंतरावर मोर्चा अडवण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.
आंदोलकांची बाजू
आम्ही न्याय्य हक्काच्या आरक्षणासाठी लढत आहोत, आंदोलन करत आहोत
जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी असहमत
मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट सर्व मराठा समजातील नागरिकांना कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. तसेच मराठा समजाला कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ द्यावा, अशी मागणी केली आहे. या उलट मुंबईत मोर्चा काढणाऱ्यांनी मराठा म्हणूनच आरक्षण द्या आणि कायद्यात टिकणारं आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.