भाजपानं राहुल गांधींना म्हटलं ‘रावण’

भाजपानं राहुल गांधींना म्हटलं ‘रावण’

नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, त्यामुळे भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गुरुवारी भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची थेट रावणाशी तुलना केली. भाजपने सोशल मीडिया हँडलवर एक पोस्टर शेअर केले, ज्यात राहुल गांधी यांना रावणाच्या रुपात दाखवण्यात आले आहे.

फोटो शेअर करत भाजपने ‘नव्या युगातील रावण. तो दुष्ट आहे, धर्माविरुद्ध आहे, रामाच्या विरोधात आहेत, देश नष्ट करणे, हेच त्याचे एकमेव ध्येय आहे,’ असे कॅप्शनही दिले आहे. भाजपने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये भारत धोक्यात आहे, असे लिहिले आहे. तसेच, इंग्रजीत A CONGRESS PARTY PRODUCTION DIRECTED BY GEORGE SOROS, असेही लिहिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version