जयंत पाटलांना ईडीची नोटीस

जयंत पाटलांना ईडीची नोटीस

मुंबई, ११ मे २०२३, प्रतिनिधी : एकीकडे सत्तासंघर्षाचा निकाल येण्याची शक्यता तर दुसरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवारी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. एफएस प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस धाडल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे शरद पवारांना शह देण्यासाठी जयंत पाटील यांच्यावर आता ईडीची नजर असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटात बोलले जात आहे. याआधी देखील विरोधकांनी ईडीवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधकांना कमजोर करण्यासाठी सरकारकडून ईडीचा अस्त्रासारखा वापर केला जात असल्याचा आरोप संजय राऊतांसह अनेकांनी केला आहे.

प्रकरण नेमकं काय?

जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आला होता. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळेच ईडीने जयंत पाटील यांना नोटीस पाठवली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version