नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार

नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यात खडाजंगी होताना दिसत आहे. राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपसह शिंदे गटावर टीका केली. भाजपला राज्यातील शिंदे सरकारचे ओझे जड वाटू लागले आहे. हे ओझे किती दिवस घेऊन फिरायचे, असे भाजपवाल्याना वाटत आहे, असे संजय राऊत म्हणाले होते. तसेच रिफायनरी प्रकल्पाबात देखील त्यांनी आरोप केले आहेत. त्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर पलटवार केला आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह सगळी लोकं आहेत. राऊत म्हणतात की भाजपला त्यांचे ओझे वाटू लागले आहे. पण आम्हाला शिवसेचे ओझे झालेले नाही. उलट महाविकास आघाडीवर उद्धव ठाकरेंचे ओझे झाले आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार १ मे रोजी होणारी मविआची वज्रमूठ सभा ही शेवटची सभा असेल. यापुढे वज्रमूठ सभा होणार नाहीत. यावर राऊतांनी स्पष्टीकरण द्यावे, असे नितेश राणे म्हणाले.

संजय राऊत शिवसेना आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य करतात. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेची तारीखही माहिती नाही. त्याला शिवसेनेबद्दल आणि बाळासाहेब यांच्याबाबत बोलण्याचा अधिकार आहे का? हा मी राजकीय आरोप करत नाही, असे नितेश राणे म्हणाले.

एक मी व्हिडीओ दाखवतो. या व्हिडिओतून संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होईल की, संजय राऊत नेमके कोण आहेत. हे चायनीज मॉडेल आहेत. बाळासाहेबांना हे शिव्या द्यायचे. शिवसेनेचा जन्म १९ जून १९६६ ला झाला आहे. पण राऊत म्हणतात शिवसेनेचा जन्म १९६९ला झाला. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेचे वर्ष माहिती नाही. ते शिवसेनेबद्दल आम्हाला शिकवतात. हे डुप्लिकेट आहेत, असेही राणे म्हणाले.

एकाच दिवसात एवढा फरक पडेल अशी अपेक्षा नव्हती. मी संजय राऊतांना सांगेन की, एवढं पण सोपं मला देऊ नका. थोडं आरेला कारे झालं पाहिजे. ते माझी पत्रकार परिषद ऐकत असतील, असा मला विश्वास आहे. थोडी टीका पण करा म्हणजे मालकालाही समजेल राऊत नेमके कोणाचे आहेत. त्यांनी बारसूचा विषय काढला. मी पवारांचा माणूस आहे, असे संजय राऊत जोरजोरात बोलायचे. पण आज पवारांच्याच भूमिकेला विरोध करताना दिसले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version