जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत स्वाईन फ्लूमुळे एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्त दिलीप शिंदे असं या पोलिस अधिकाऱ्याचं नाव आहे.
मुंबई वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलिस अधिकारी एसीपी दिलीप शिंदे यांचा, मंगळवारी संध्याकाळी होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला.
दिलीप शिंदे हे मूळचे सोलापूरचे होते. 1987 मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून ते पोलिस दलात रुजू झाले होते. सांताक्रूझ, माहिम आणि धारावी पोलिस स्टेशनमध्ये
त्यांनी काम केलं होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.