Beed Crime : बीडमध्ये ऑनलाइन फसवणूक! कमिशनच्या आमिषाने 24 कोटींचा गंडा; चार अनोळखी खातेदारांवर गुन्हा दाखल

Beed Crime : बीडमध्ये ऑनलाइन फसवणूक! कमिशनच्या आमिषाने 24 कोटींचा गंडा; चार अनोळखी खातेदारांवर गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात विविध बँकांमधील मनी म्युल खात्यांचा वापर करून तब्बल 24 कोटी रुपयांच्या ऑनलाइन सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टल आणि समन्वय पोर्टलवरील तपासातून सायबर गुन्हेगारांचे मोठे सिंडिकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बीड सायबर पोलिसांनी चार अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : Moshi Garbage Depot Tragedy: मोशी कचरा डेपो दुर्घटना! पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही जीवन संपवलं; 'हे' धक्कादायक कारण आलं समोर, नातेवाइकांचा दावा

याबाबत सायबर पोलीस निरीक्षक स्वप्निल उनावणे यांनी माहिती देताना सांगितले की, सायबर गुन्हेगारांनी नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून मिळालेली रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळवून बेकायदेशीरपणे काढून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. डीसीबी बँकेच्या बहिरवाडी शाखेतील एका खात्यात तब्बल 23 कोटी 73 लाख 31 हजार 665 रुपये जमा करण्यात आले. त्यापैकी 23 कोटी 70 लाख 31 हजार 665 रुपये बेकायदेशीरपणे काढून घेण्यात आल्याचे समोर आले आहे. याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्र आणि आयडीबीआय बँकेच्या मोंढा रोड शाखेतील विविध खात्यांचाही सायबर फसवणुकीच्या रकमेसाठी वापर झाल्याचे तपासात आढळले आहे.

कमिशनच्या आमिषापोटी स्वतःची बँक खाती सायबर गुन्हेगारांना उपलब्ध करून देणाऱ्या खातेदारांचा या सिंडिकेटमध्ये सक्रिय सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या खात्यांचा वापर फसवणुकीची रक्कम जमा करण्यासाठी आणि पुढे वितरित करण्यासाठी करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बीड सायबर पोलीस ठाण्यात आयटी ॲक्ट कलम 66 तसेच BNS 2023 मधील कलम 318(4), 112(2), 317(२), 61(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version