आठवीपर्यंत नापास न करण्याचं धोरण आता रद्द होणार

आठवीपर्यंत नापास न करण्याचं धोरण आता रद्द होणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आठवीपर्यंत आपण पास होणारच हा ठाम विश्वास असणाऱ्या विद्यार्थ्यांनो आता सावध व्हा. कारण, आठवीपर्यंत नापास न करण्याचं धोरण आता रद्द होणार आहे.

 

केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा आता पुन्हा सक्तीची करण्यात येणार आहे.

 

शिक्षण अधिकार कायद्यानुसार आतापर्यंत आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या वर्गात पाठवलं जात होते.

 

मात्र, आता नापास झाल्यास पुन्हा एकदा परीक्षा देऊन पास होण्याची संधी दिली जाईल आणि त्यात पास झाल्यावरच पुढच्या वर्गात पाठवलं जाईल, असा प्रस्ताव आहे.

 

हे विधेयत आता संसदेत मांडला जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version