नवनाथ बोरकर, प्रतिनिधी
बारामती : बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथील दादा पाटीलनगर परिसरात एकाच घरात 41 वर्षीय आई व 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. विवेक विजय गावडे (वय 17) याने घरातील पत्र्याच्या अँगलला सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले, तर त्याची आई रमा विजय गावडे (वय 41) या घरातील खोलीत मृतावस्थेत आढळून आल्या. या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली आहे. या सर्व घटनेचा तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, घरधनी विजय रामदास गावडे हे गुरुवार, 20 ऑगस्ट रोजी रात्रपाळीला गेले होते. शुक्रवारी सकाळी काम संपवून ते नेहमीप्रमाणे तांदुळवाडी येथील घरी परतले. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला आणि पत्नी रमा गावडे तसेच मुलगा विवेक या दोघांना आवाज दिले. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि दरवाजा आतूनच बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काहीतरी अघटीत घडल्याचा संशय आल्याने विजय गावडे यांनी तातडीने शेजारी राहणारे सूरज भिमराव शिंदे यांना मदतीसाठी बोलावले. दोघांनी मिळून दरवाजा उघडला असता समोर आलेले दृश्य अत्यंत भीषण होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.