Kolhapur Crime : लक्ष्मीहार, मंगळसूत्र, अंगठ्या, सोनसाखळ्या, कर्णफुले…; तब्बल 14 तोळ्यांचा ऐवज लंपास, जुगाराच्या व्यसनापायी घरातच चोरी

Kolhapur Crime : लक्ष्मीहार, मंगळसूत्र, अंगठ्या, सोनसाखळ्या, कर्णफुले…; तब्बल 14 तोळ्यांचा ऐवज लंपास, जुगाराच्या व्यसनापायी घरातच चोरी

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये स्वतःच्याच घरात चोरी करणाऱ्या तरुणाला अटक करण्याची घटना समोर आली आहे. या तरुणाने घरातील 14 तोळे दागिने चोरी करून त्यातून आलेल्या लाखो रुपयांची गोव्यातील कसिनो आणि जुगारात उधळपट्टी केल्याने समजते. या प्रकरणी करवीर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. आतिश संजय चौगुले (वय 26, रा. सूर्यनगरी, हणमंतवाडी रोड, ता. करवीर) असे त्याचे नाव असून ऑक्टोबर 2025 ते जुलै 2026 दरम्यान चोरी केल्याची कबुली त्याने दिली. फिर्यादी आणि तरुणाचे वडील संजय चौगुले (रा. शिंगणापूर) यांच्या घरातील 14 तोळे दागिने चोरीस गेल्याचे रविवार, 30 ऑगस्ट रोजी निदर्शनास आले. चोरटा माहीतगार असल्याचा संशय व्यक्त होत असतानाच संजय चौगुले यांचा मुलगा कामधंदा न करता उधळपट्टी करत असल्याचे कळल्यावर पोलिसांनी चौकशी केली. याआधी तो लक्षतीर्थ येथील जुगार अड्डयावरील कारवाईतही सापडला होता. करवीर पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. 

हेही वाचा : Maratha Reservation: अंतरवाली सराटीत दुर्दैवी घटना! मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी आलेल्या आंदोलकाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version