Farmer Death Crisis : धक्कादायक! शेतकरी हताश होऊन उचलताहेत टोकाचं पाऊल; मराठवाड्यातील शेतीची स्थिती चिंताजनक, आकडेवारी समोर

Farmer Death Crisis :  धक्कादायक! शेतकरी हताश होऊन उचलताहेत टोकाचं पाऊल; मराठवाड्यातील शेतीची स्थिती चिंताजनक, आकडेवारी समोर

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शेतकरी आत्महत्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत राज्यात 1216 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी 450 शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारी मदत मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 463आत्महत्या झाल्या असून, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 109 शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. यापाठोपाठ अमरावती विभागात 411 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, या विभागातील यवतमाळ जिल्ह्यातही गंभीर स्थिती आहे. जानेवारी ते जूनअखेर यवतमाळमध्ये 143 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेली सलग दोन वर्षे अतिवृष्टीने शेतकऱ्यांना झोडपले असून, मागील खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते.

हेही वाचा : Sanjay Raut : 'मोदींच्या चहा विकण्याचा पुरावा द्या…'; संजय राऊतांचे भाजपला खुलं आव्हान

शेतकरी आत्महत्यांच्या सरकारी आकडेवारीवर नजर टाकल्यास खरीप हंगामातील मशागतीच्या आणि लागवडीच्या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांनी जीवन संपविल्याचे दिसते. पुणे विभागात 37 आत्महत्या झाल्या असून, सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 33 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नाशिक विभागात 138 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, जळगाव जिल्ह्यात 75 शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील परिस्थिती गंभीर असून, राज्यातील सर्वाधिक आत्महत्या याच विभागात झाल्या आहेत. विभागात 463, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 109 शेतकऱ्यांनी सहा महिन्यांत आत्महत्या केल्या आहेत. यापाठोपाठ बीड जिल्ह्यात 95 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये जानेवारीत 24, फेब्रुवारीत सहा, मार्चमध्ये 19, एप्रिलमध्ये 24, मेमध्ये 14, तर जूनमध्ये आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यात 65 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, मार्चमध्ये 16, मेमध्ये 10, तर जूनमध्ये 16 शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्यात 143, अमरावतीत 76, अकोल्यात 70, तर बुलडाणा जिल्ह्यात 69 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नागपूर विभागात 167 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात 60 शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version