जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नालासोपारामध्ये रविवारी एका टँकर चालकाची चूक निष्पाप मुलाच्या जीवावर बेतली असती.
सकाळी 11च्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या आचोले रोड स्थित साडी कॅपाउंड परिसरात एका टँकर चालकाच्या निष्काळजी पणा मुले 12 वर्षीय चिमुरड्याला आपला एक पाय गमवावा लागला.
ही सगळी घटना CCTV फुटेज मध्ये कैद झाली.
विशेष,म्हणजे जेव्हा हा अपघात घडला त्या नंतर टँकर चालकाने पळ काढण्या चा प्रयत्न केला पण जवळच आसलेल्या नागरिकांनी त्या टँकर चालकाला ताब्यात घेतले.
त्यानंतर तुलिंज पोलिसांच्या स्वाधीन केलेव सध्या त्याची चौकशी सुरू आहे. जवळच्या खाजगी रुग्णालयात 12 वर्षीय चिमुरड्यावर उपचार सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.