ई-बसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद

ई-बसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद

नाशिक, प्रतिनिधी, दि. ९ एप्रिल २०२४ : नाशिक ते सप्तश्रृंगीगड अशा श्री सप्तश्रृंगगडावर १ एप्रिलपासून सुरू झालेल्या वातानुकूलित इ- बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आठवड्यात ६ हजार किलोमीटरचा प्रवास होऊन २ लाख ३२ हजाराचा व्यवसाय या दोन्ही इ-बसने दिला आहे. सप्तश्रृंगीदेवी गड रस्ता घाट व वळणाचा आहे. मात्र याचा कुठलाही परिणाम या इ-बसवर नसून पिकअपवरही काही परिणाम नाही. ठिकठिकाणी थांब्यामुळे काही प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. जर नाशिक ते गड व गड ते नाशिक असे प्रत्येक फेरीला ३५ प्रवाशी थेटचे मिळाल्यास ही बससेवा नफ्यात येऊ शकते. यंदा १६ एप्रिलपासून चैत्रोत्सव सुरू होत असल्याने बसला प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version