दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून व्याजासह कर्जवसुली

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून व्याजासह कर्जवसुली

छत्रपती संभाजीनगर, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी :  सरकारने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १४ मंडळे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. तसेच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मंडळांची संख्या देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करावे, कर्ज वुसली करू नये, यासह विविध निर्णय घेण्यात आले आहेत. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणे सर्व विभागाचे कर्तव्य व जाबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यांच्या सोसायट्यांकडून शेतकऱ्यांना फोन करून नोटीस बजावून कर्ज भरण्यास सांगण्यात आले. व्याजासह ५५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांकडून कर्जवसुली देखील करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारच्या आदेशाला बँका जुमानात नसल्याने शेतकऱ्यांकडून आश्चर्य आणि खेदही व्यक्त करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version