मुंबई, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : बिग बॉस ओटीटी २ विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादवबाबत मोठी बातमी समोर आली आहे. यूट्यूबरला नोएडा पोलिलांनी कोब्रा प्रकरणात अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सापाच्या विषासह ५ जणांना अटक केली होती.
एल्विश यादववर एका पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ०८ नोव्हेंबर रोजी नोएडा पोलिसांनी रेव पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली होती. या प्रकरणात यूट्यूबर एल्विश यादवदेखील आरोपी असल्याचं समोर आलं. पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. या प्रकरणानंतर एल्विशने आपली प्रतिक्रिया देत एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याने व्हिडिओद्वारे माझ्या विरुद्ध चाललेल्या या सर्व गोष्टी खोट्या असून माझा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचं त्याने म्हटलं होतं. त्याशिवाय त्याने, माझ्याबद्दल जे काही बोलले जात आहे त्यात तथ्य नाही. आरोप करून माझं नाव खराब करु नका. मी यूपी पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहे. मी यूपी पोलीस आणि माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की, या प्रकरणात माझ्यावरील आरोपांपैकी एक टक्के आरोप देखील सिद्ध झाले, तर मी जबाबदारी घेण्यास तयार आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका. माझा त्याच्याशी संबंध नाही, असं म्हणत त्याने स्वत:ला निर्दोष असल्याचं म्हटलं होतं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.