विठुमाऊलीचे केवळ मुखदर्शन दीड महिन्यासाठी विठ्ठलाचे गाभारा दर्शन बंद

विठुमाऊलीचे केवळ मुखदर्शन दीड महिन्यासाठी विठ्ठलाचे गाभारा दर्शन बंद

पंढरपूर, दि. १५ मार्च, २०२४, प्रतिनिधी : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विकास आराखड्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे आजपासून विठुमाऊलीचे केवळ मुखदर्शन होणार आहे. चरणस्पर्श दर्शन दीड महिन्यांसाठी बंद राहणार आहे.

विठ्ठलाच्या मंदिर गाभाऱ्याचे काम करण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या काळात रोज सकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन सुरू राहणार आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिर गाभाऱ्यात पुरातन रूप देण्याचे काम आजपासून सुरू होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version