मध्य प्रदेशमध्ये फटाका कारखान्यात स्फोट

मध्य प्रदेशमध्ये फटाका कारखान्यात स्फोट

हरदा, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मध्य प्रदेशमधील हरदा येथे फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी मोठ्या संख्येने रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे पथक आणि पोलीस रवाना झाले आहेत. अग्निशमन दलाने स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी फोनवरून संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. मदतकार्यासाठी महत्त्वाचे निर्देश दिले. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांनी घटनेची माहिती मिळताच शोक व्यक्त केला आहे. नियमानुसार हरदातील स्फोटात मृत्यू झालेल्यांच्या जवळच्या नातलगांना चार लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच नियमानुसार जखमींच्या उपचारांचा खर्च शासनाकडून केला जाईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version