पुण्यात सिलेंडर स्फोट

पुण्यात सिलेंडर स्फोट

पुणे, २७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यातील विमाननगर भागातील रोहन मिथिला इमारतीच्या परिसरात बांधकाम मजुरांच्या वसाहतीत बुधवारी दुपारी आग लागली. तात्पुरत्या बांधण्यात आलेल्या घरांमध्ये ठेवलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. एकापाठोपाठ दहा सिलेंडरचे स्फोट झाले.

विमाननगर भागातील सिम्बॉयसिस कॉलेजजवळ रोहन मिथिला इमारत आहे. या परिसरात नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथे बांधकाम मजूर राहायला आहेत. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास बांधकाम मजुरांच्या वसाहतीत (लेबर कॅम्प) आग लागली. आग लागल्यानंतर घरातील गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी आले. अग्निशमन दलाने थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवले.

ज्या ठिकाणी आग लागली त्याच भागात आणखी जवळपास १०० सिलेंडर ठेवले होते. हे सर्व सिलेंडर फुटले असते तर दुर्घटनेची तीव्रता आणखी वाढली असती. पण अग्निशमन दलाने वेळेत केलेल्या कारवाईमुळे हे संकट टळले.

विमाननगरमध्ये एका छोट्या जागेत सिलेंडरचा मोठा साठा का ठेवला होता, याची चौकशी होणार आहे,

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version