पेणमध्ये पाण्यासाठी उपोषण

पेणमध्ये पाण्यासाठी उपोषण

पेण, १४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वाशी खारेपाट विभागात पाण्यासाठी उपोषण सुरू आहे. सलग आठ दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. आंदोलकांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून जलसंपदा विभागाला प्रतिकात्मक श्रद्धांजली अर्पण केली. पण अद्याप सरकारी यंत्रणेला जाग आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी हेटवणे धरणाचे पाणी द्यावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. सरकारकडून अद्याप ही मागणी मंजूर झालेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version