नाशिक स्फोटाने हादरले

नाशिक स्फोटाने हादरले

नाशिक, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिकच्या गंगापूर रोड येथील शांतीनिकेतन चौक परिसरात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जात असलेल्या वाहनात स्फोट झाला. वाहनातील तीन ऑक्सिजन सिलेंडरपैकी एकाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे वाहनाचे तसेच वाहनातील सर्व ऑक्सिजन सिलेंडरचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जात असलेल्या वाहनाच्या जवळून एक रिक्षा जात होती. या रिक्षाचेही स्फोटामुळे नुकसान झाले. परिसरातील काही इमारतींच्या काचा फुटल्या. स्फोटाच्या आवाजाने पूर्ण परिसर हादरला. नागरिक घाबरले. स्फोटानंतर घटनास्थळी गर्दी झाली. अग्निशमन दलाच्या एका गाडीने स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version