सातवीतील आदितीपुढे प्रशासन नमले

सातवीतील आदितीपुढे प्रशासन नमले

पुणे, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: पुण्याजवळील कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामीण सर्वागीण विकास विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोन्ही शाळांना लागूनच कुंजीरवाडीचा कचरा डेपो असून हा कचरा डेपो स्थलांतरित व्हावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक, कर्मचारी ग्रामपंचायतीकडे गेली दहा वर्ष करत होते.

मात्र कचरा डेपो स्थलांतरावर कोणताही तोडगा निघत नव्हता, शेवटी सातवीचे शिक्षण घेणारी आदिती ज्ञानेश्वर सावंत या विद्यार्थिनीने पुढाकार घेऊन काल शुक्रवारी सकाळी आठ वाजता ग्रामपंचायत समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. तिला सहकार्य करण्यासाठी सर्वच विद्यार्थी आदिती सोबत ग्रामपंचायत समोर बसले होते. दुपारी ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा डेपो स्थलांतर करण्याचे जाहीर केल्यानंतर आदितीने उपोषण सोडले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version