मुंबई, ४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषकातील उर्वरित सामन्यांसाठी के. एल. राहुल याला भारतीय संघाचा उपकर्णधार करण्यात आले आहे. रोहित शर्मा कर्णधार आणि के. एल. राहुल उपकर्णधार म्हणून जबाबदारी हाताळणार आहे. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या याला बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना टाचेला दुखापत झाली. ही दुखापत बरी होण्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेऊन त्याला विश्वचषकासाठीच्या उर्वरित सामन्यांतून वगळण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. यानंतर के. एल. राहुल याच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात भारताचे दोन साखळी सामने शिल्लक आहेत. यानंतर भारत उपांत्य फेरीचा सामना खेळेल. उपांत्य फेरीत विजय मिळवल्यास भारत अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.