ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन

नवी मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनोख्या कीर्तन शैलीसाठी ते प्रसिद्ध होते.

मागील काही दिवसांपासून बाबामहाराज सातारकर आजारी होते. नवी मुंबई शहरातील नेरुळमध्ये गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी तीन वाजल्यानंतर नेरुळ जिमखान्याच्या समोर असलेल्या आणि बाबामहाराजांनी बांधलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. संध्याकाळी पाच वाजता नेरुळ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बाबामहाराज सातारकर यांचा अल्पपरिचय

मूळ नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे

जन्म : ५ फेब्रुवारी १९३६, सातारा

गोरे सातारकर घराण्याचे सदस्य

वकिलीचे शिक्षण घेतले

घराण्यात किर्तनाची परंपरा

वारकरी संप्रदायात सातारकर फड प्रसिद्ध

दादामहाराज सातारकर यांनी फड सुरू केला. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत.

पुढे अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली.

अप्पामहाराजांनंतर नीळकंठ ज्ञानेश्वर अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली.

………….

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन झाल्याचे कळताच अनेक नेत्यांनी ट्वीट करून शोकसंदेश दिले.

https://twitter.com/mieknathshinde/status/1717430036415045717

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version