सिक्कीममधील पुरात अडकले महाराष्ट्रातील पर्यटक

सिक्कीममधील पुरात अडकले महाराष्ट्रातील पर्यटक

छत्रपती संभाजीनगर, ७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : सिक्कीममधील पुरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ जण अडकल्याची माहिती समोर आलीय. हे सर्व पर्यटक आठ दिवसांपूर्वी सिक्कीमला गेले होते. अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिक्कीममध्ये २९ सप्टेंबर रोजी ढगफुटीनंतर नदीच्या पाण्याची पातळी पंधरा ते वीस फुटांनी वाढली. पूर आला. या पुरात जवळच्या तळावरील सैनिक तसेच नागरिक वाहून गेले. सिल्लोड येथील कुणाल सहारे, राजश्री कुणाल सहारे, सर्वेश कुणाल सहारे, साईशा कुणाल सहारे, स्नेश जैन, शीतल जैन, मोक्ष जैन, सिद्धांत जैन अशी सिक्कीममध्ये अडकलेल्या पर्यटकांची नावं आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version