रत्नागिरीत उद्धव गटाला खिंडार

रत्नागिरीत उद्धव गटाला खिंडार

रत्नागिरी, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: खेड तालुक्यातील लोटे विभागातील उद्धव गटाला खिंडार पडले आहे. तालुकाप्रमुख चंद्रकांत चाळके, उप जिल्हाप्रमुख राजूशेठ आंब्रे, माजी उप सभापती जीवन आंब्रे, उद्योजक विशाल घोसाळकर यांच्यासह गुहागर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या खेड तालुक्यातील साडेतीन जिल्हा परिषद गटातील नऊ गावच्या ग्रामपंचायत सदस्यांनी, शाखाप्रमुखांनी शनिवारी शिवसेनेत जाहिररित्या पक्षप्रवेश केला. आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या नेत्यांनी शिवसेनेत घरवापसी केली आहे. या सर्व पक्ष प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून विकासासाठी निधीची कामतरता कधीही पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी आमदार योगेश कदम यांनी सर्व उपस्थितांना दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version