कोपर्डी खटल्यातील जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेची आत्महत्या

कोपर्डी खटल्यातील जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेची आत्महत्या

पुणे, १० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे उर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आत्महत्या केली. टॉवेल वापरून त्याने गळफास लावून घेतला. पप्पूने रविवारी पहाटे आत्महत्या केली. सकाळी सहाच्या सुमारास कारागृहात पोलीस कर्मचाऱ्यांना त्याचा मृतदेह आढळला. यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी जितेंद्र शिंदे उर्फ पप्पू शिंदे याच्यासह तीन जणांना नगर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी २०१७ मध्ये दोषी ठरवले होते. रविवारी पप्पूने आत्महत्या केली. नियमानुसार कारागृह प्रशासनाने जितेंद्र शिंदे उर्फ पप्पू शिंदे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version