सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प

सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प

नाशिक, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : निर्यातीच्या कांद्यावर केंद्र सरकारने ४० टक्के कर लागू केला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव सलग तिसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारने प्रतिक्विंटल २४१० रुपये या दराने दोन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय झाला असला तरी व्यापारी संघटनांनी बंद मागे घेतलेला नाही.

निर्यातीसाठी पाठवलेला, बंदरात तसेच टोलनाक्यांवर अडकलेला कांदा सोडावा, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. कांद्याला प्रतिक्विंटल चार हजार रुपयांचा दर द्यावा अशीही मागणी काही व्यापाऱ्यांनी आणि केंद्र सरकारच्या राजकीय विरोधकांनी सुरू केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version