‘पक्षातील वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी’

‘पक्षातील वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी’

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर सामना संपादकीयमधून भाष्य करण्यात आले आहे. शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मन असला तरी पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असा निशाणा थेट शरद पवारांवर सामना अग्रलेखातून साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. परंतु, राजकारणापेक्षा जास्त खळबळ त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही, अशी टीका थेट सामनातून शरद पवारांवर करण्यात आली आहे.

समानातील टीकेवर शरद पवारांचे काय म्हणाले?
‘माझ्या वाचनात आलेलं नाही. पण मी वाचल्यावर मत देईन. मात्र सामना किंवा त्यांचे संपादक आम्ही एकत्र काम करतो आणि एकत्र काम करत असताना पूर्ण माहितीवरच त्यावर भाष्य करणं योग्य होईल. नाहीतर उगाच गैरसमज होतात. माझी खात्री आहे की त्यांची भूमिका ही ऐक्याला पोषक असेल.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version