अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनची सुरुवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय तसंच गुरुदेव सेवा मंडळ यातील काही मंडळांनी हरिपाठाचं वाचन केलं. तर लेझीम पथकानं सर्वांचं लक्ष वेधलं, यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. हे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असून याची उत्सुकता साहित्य प्रेमींमध्ये दिसून येतं आहे कारण संमेलन उद्घाटनापूर्वीच हाऊसफुल्ल झाले आहे.
स्वावलंबी शिक्षण मंडळाच्या पटांगणावर साहित्य नगरी सजली आहे. साहित्य संमेलना उदघाट्न आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच संमेलनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर उपस्थितीत राहणार आहेत. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी आणि कवी कुमार विश्वास अशा दोन हिंदी भाषिक साहित्यिकांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.