योगींच्या दौऱ्यावर विरोधकांची टीका

योगींच्या दौऱ्यावर विरोधकांची टीका

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. योगी आदित्यनाथ आज देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई येथून देशांतर्गत रोड शोची सुरुवात केली. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढावी यासाठी योगी आदित्यनाथ यांचा हा मुंबई दौरा आयोजित कऱण्यात आला आहे. सिने जगतातील लोकांचीही भेट घेणार असून, नोएडामध्ये उभारल्या जाणाऱ्या फिल्म सिटीबाबत चर्चा करणार आहेत. मात्र योगी आदित्यनाथ विरोधकांच्या चांगलेच निशाण्यावर आले आहेत. त्यांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे.

संजय राऊत बोलताना म्हणाले योगी आदित्यनाथ यांना रोड शो करण्याची गरज काय आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. ते सन्मानाने आले आहेत. त्यांनी सन्मानाने परत जावं. चर्चा करा. तुमच्याबद्दल आदर आहे. तो आदर आणि प्रेम राहिलं. शक्यतो हे राजकीय उद्योग इथे करू नका. उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो का? असा प्रश्न राऊत यांनी केला आहे.

जर योगी आदित्यनाथ फिल्म इंडस्ट्री कोणी घेऊन नाही जाऊ शकत. त्यांना हाव तर त्यांनी सिनेमा वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा यामुळे देशाच्या विकासासाठी मदत होईल. त्यांना मुंबईत येऊन रोड शो करण्याची गरज काय आहे असा प्रश्न संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना केला आहे. जर ते गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आले असतील तर तुम्ही त्यांच्याशी बोला. उद्योगपतींशी बोला. तुमच्या राज्याचा विकास करण्यासाठी आलेला आहेत तर त्यांना भेटा चर्चा करा रोड शो कशासाठी इथ तुमची राजकीय नीती वापरू नका असंही ते म्हणाले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री दावोसला जात आहेत. तिथे गुंतवणुकदारांची परिषद असते. तिथे जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दावोसच्या रस्त्यावर रोड शो होणार आहे का? मग यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहल हॉटेल समोर रोड शो करण्याची गरज काय? हे राजकारणाचे धंदे बंद करा, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version