ठाण्यात मेट्रोचं काम सुरु असताना अपघात एका महिलेचा मृत्यू

ठाण्यात मेट्रोचं काम सुरु असताना अपघात एका महिलेचा मृत्यू

ठाणे शहरातील मेट्रो 4 च्या प्रकल्पाचे बांधकाम सुरु असताना अपघात झाला आहे. गर्डरची लोखंडी प्लेट कोसळल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ठाण्यातील विवियाना मॉल परिसरात ही घटना घडली आहे. एक महिला याठिकाणी रस्ता ओलांडत असताना मेट्रो प्रकल्पाच्या गर्डरची लोखंडी प्लेट थेट खाली कोसळली. अत्यंत जड वजनाची ही प्लेट महिलेच्या अंगावर पडली आणि ती खाली दबली गेली. यामध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी माहिती देताच राबोडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सुनिता बाबासाहेब कांबळे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून हि महिला ३७ वर्षाची होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, पिकअप वाहनासह, राबोडी पोलीस कर्मचारी आणि वर्तक नगर पोलीस कर्मचारी एका रुग्णवाहिकेसह उपस्थित होते.ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.या महिलेचा मृतदेह ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version