शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर काही प्रश्न उपस्थिती केले जात आहे. अशातच बीडमध्ये एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंगमधील संभाषणानुसार ३ ऑगस्टला मुंबईकडे जात असताना शिक्रापूरपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन गाड्यांनी पाठलाग करत होत्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विनायक मेटे यांचं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाती निधन झालं. मेटे यांच्या गाडीच्या ज्या प्रकार अपघात झाला, त्यावरून काही प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पण, विनायक मेटे यांच्या सहकाऱ्याचा फोन रेकॉर्ड कॉल व्हायरल झाला आहे. अण्णासाहेब मायकर असं त्यांचं नाव आहे. अण्णासाहेब मायकर हे ३ ऑगस्टला मेटे यांच्यासोबतच प्रवास करत होते.
या फोन कॉल रेकॉर्डमधील संवादानुसार, तीन ऑगस्टला विनायक मेटे यांच्यासोबत आम्ही मुंबईकडे जात होतो. त्यावेळी शिक्रापूरपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन गाड्या पाठलाग करत होत्या. यामध्ये आयशर ट्रक देखिल होता. शिक्रापूरपासून ही गाडी पाठलाग करत होती, ती गाडी कधी पाठीमागे राहत होती तर कधी ओव्हरटेक करून पुढे जात होती, यामध्ये आयशर एक ट्रक सुद्धा होता, त्यामुळे आम्हाला काही पुढे जाता येत नव्हते, अशी माहिती मेटेंचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी दिली.
बीडमधून मुंबईला निघालो होतो, रात्री ११.३० वाजता शिक्रापूरजवळ पोहोचलो होतो. एक गाडी आमचा पाठलाग करत होती. समोर आयशर ट्रक होता. त्या गाडीतली माणसं आम्हाला हात करून गाडी थांबवण्यासाठी इशारा करत होते. पण, मेटे साहेबांनी गाडी थांबवण्यास नकार दिला, गाडी आयशर ट्रकच्या मागेच ठेवण्यास सांगितले होते. पुढे एक छोटे गाव आलं, तिथे या गाडीने आमच्या गाडीला जोरात कट मारला आणि निघून गेले. मग आम्ही आयशर ट्रकला मागे टाकून पुढे निघून गेलो, अशी माहिती मायकर यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.