यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील लालगुडा परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.१२ वी च्या परीक्षेत कमी गूण मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. सेजल अनिल सालुरकर असे मृत तरुणीचे नाव आहे. मुलीने आत्महत्या केल्याच्या धक्क्याने तिच्या आईची प्रकृती खालावली असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वणी शहरातील सेजल बालगुडे हिला दहावीच्या परिक्षेत ९० टक्के गुण मिळाले होते. मात्र बारावीच्या परिक्षेचा निकाल काल जाहिर झाला. तिला ६५ टक्के गुण मिळाले. दहावीच्या तुलनेते बारावीला कमी गुण मिळाल्याने सेजर नैराश्यात होती. याच नैराश्यातून तिने गळफास घेउन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येमुळे तिच्या आईची तब्येत खालावली आहे. शिक्षण आणि पुढील करीअरच्या वाढत्या दबावामुळे विद्यार्थ्यांकडून आत्महत्या सारखे पर्याय निवडणे पालकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.
तर, दुसरीकडे १२वीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे औरंगाबादेत एका तरुणीने रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केली आहे. मनीषा भाऊसाहेब गायकवाड असे तरुणीचे नाव आहे. मनीषाला केवळ ४ मार्क कमी मिळाले होते. दुसरीकडे औरंगाबादमध्ये २ विषयात नापास झाल्याने एका विद्यार्थीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तसेच, यवतमाळमध्येच 12वीच्या परीक्षेत दोन विषयात नापास झाल्यामुळे विधार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी ४ वाजता सेवानगर भागात घडली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.