गणेश नाईकांना अटकपूर्व जामीन मंजूर

गणेश नाईकांना अटकपूर्व जामीन मंजूर

भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली असून न्यायालयाने गणेश नाईकांना दिलासा दिला आहे. पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयाने गणेश नाईकांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, न्यायालयाने गणेश नाईकांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण?

भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर २७ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा दावा करणाऱ्या महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे. नाईक यांच्यासोबत २७ वर्ष लिव्ह इनमध्ये राहून त्यांच्याकडून मला एक मुलगा आहे, परंतु ते त्याचा स्वीकार करण्यास नकार देत असल्यामुळे संबंधित महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नाईकांवर कारवाई न झाल्यामुळे पीडित महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर पोलिसांनी गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराच गुन्हा दाखल केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version