अमरावतीच्या तिवसा मतदार संघात येणाऱ्या मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई गावात युवक काँग्रेस शिव शक्ती गणेशोत्सव मंडळने भर रस्त्यावर व चौकात तृतीयपंथींचे नृत्य आयोजित केले. कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्त कुटुबीयांना मदत देण्याच्या नावाखाली चक्क तृतीयपंथी नाचवल्यामुळे समाज माध्यमावर निषेध व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तसेच तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचा फोटो असलेले बॅनर सुद्धा स्टेजवर लावण्यात आला होता.
अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई गावात मोठ्या प्रमाणावर गणपती उत्सव साजरा केला जातो. यानिमीत्त विविध मंडळांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. दरम्यान, गावातील शिवशक्ती गणेश मंडळाच्या मंचावरच तृतीयपंथींच्या नृत्याचा कार्यक्रम झाला. मात्र, या कार्यक्रमाशी आमचा कुठलाही सबंध नसून या कार्यक्रमाचा खर्च हा युवक काँग्रेसने केल्याचा शिवशक्ती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नेर पिंगळाई या गावात ही प्रथा १९६३ पासून आहे .या गावातील मठामध्ये सुद्धा तृतीय पंथी असतात, जर हे इनलिगल असेल तर कायद्यानुसार यावर बंदी घालावी, तर काही महिन्यांपूर्वी कृषीमंत्रीने सुद्धा असे नृत्य ठेवलं होतं, निवडणूक समोर असल्याने विरोधी काही इशू करण्याचा प्रयत्न करत आहे अशी प्रतिक्रिया आमदार यशमती ठाकूर यांनी दिली
अत्यंत दरिद्री उद्देशाने हा कार्यक्रम आखला असून तरुण मुल-मुली नाचवून त्याची मत घेऊ त्यांना खुश करू आशा उद्देशाने हा कार्यक्रम केला असून हा सामाजिक अपराध असल्याचं भाजपचे जिल्हा अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी म्हटले
दरम्यान, तृतीयपंथींच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करणारे लोक, तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचेच कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर सर्वस्तरांवरून टिका केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.