सरकारने 370 कलम हटवले त्याच हिमतीने अयोध्येत राममंदिरही उभे राहील. न्यायालयाचा निर्णय जो लागायचा तो लागेल, पण राम मंदीर उभं राहीलंच. असे ठाम मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ‘ त्यांनी मातोश्री’वर शिवसेना पदाधिकार्यांची बैठक घेतली आहे.
‘मातोश्री’वर शिवसेना पदाधिकार्यांच्या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी राममंदिरासंदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने ज्या ताकदीने जम्मू काश्मीरचे कलम 370 रद्द केले त्याप्रमाणे राम मंदीरही बांधावे असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
न्यायालयाचा निर्णय जो लागायचा तो लागेल, सर्वोच्च न्यायालयात अयोध्या व राममंदिरासंदर्भात रोज सुनावणी सुरू असून कोणत्याही क्षणी निकाल अपेक्षित आहे. ‘‘शिवसेनेने राममंदिरासंदर्भात केलेला संघर्ष व गेल्या वर्षभरात राममंदिराप्रश्नी शिवसेनेने लावलेला ‘रेटा’ यामुळे सकारात्मक गोष्टी घडत आहेत व राममंदिर निर्माणकार्य कोणीच रोखू शकत नसल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
‘बाबरी’ पाडणारे व त्यात हौतात्म्य पत्करणारे शिवसैनिकच होते, याची आठवण करून देत गेल्या वर्षभरात आपण दोन वेळा अयोध्येत जाऊन राममंदिर प्रश्नावर जाग आणल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘अयोध्या’ आंदोलनात शिवसेनेचे योगदान अमूल्य आहे व देशाने त्याची दखल घेतली आहे. राममंदिराची पहिली वीट रचण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.